मी म्हणजे मीच एक मुलगी....
मी म्हणजे मीच एक मुलगी....


कुटुंबात लक्ष्मी रूपाने पडते इवलेस पाऊल
घरात सगळ्यांनाच लागते माझ्या येण्याची चाहूल,
जिकडे तिकडे आनंद सगळ्यांचा गगनात मावेना
मी घरात येणार म्हणून कोणाचाच जीव लागेना,
मी म्हणजे मीच... एक मुलगी!!!!
कृपा परमेश्वराची जन्म झाला माझा
घरात आनंद झाला माझ्या येण्याचा,
बाबांचे बोट धरून चालू लागली त्यांची छकुली
आईच्या वात्सल्यातत वाढू लागली तिची सावली,
मी म्हणजे मीच... एक मुलगी!!!!
करुनी चांगले संस्कार त्यांनी वाढवली मला
हाती घेतलेले ध्येय आता गाठायचंय मला,
खूप कष्ट सोसलेत त्यांनी माझ्या स्वप्नांसाठी
फेडेन त्यांचे पांग मी नक्कीच एकेदिवशी,
मी म्हणजे मीच... एक मुलगी!!!!
लाज बनुनी त्यांच्या घरची मी चालली परक्या घरी
पाणावले त्यांचे चक्षु, कारण सोडून गेली त्यांची परी,
थाटायचाय आता नवीन संसार हेच स्वप्न उरी
घेऊनी आठवण माहेरची, लेक जाई सासरी,
मी म्हणजे मीच... एक मुलगी!!!!
सोपं नसतं मुलगी होणं, खूप काही सोसावं लागतं
परक्याची होणार म्हणून आपल्याच घरात परकं होऊन वावरावं लागतं,
दिल्या घरी सुखी राहा, हाच असतो कानमंत्र घरच्यांचा
दोन्ही कुटुंब सांभाळून पुढे न्यायचा असतो सासरचा वारसा,
मी म्हणजे मीच... एक मुलगी!!!!
या घरची मी मुलगी असते, त्या घरची मी सून
असाच गाडा ओढायचाय, दोन्ही कुटुंबे धरून,
खूप येतील संकटे वळणा-वळणांवर, मात करायचीय मला
दुर्लक्ष करून स्वतःवर, कुटुंब सांभाळायचंय मला,
मी म्हणजे मीच... एक मुलगी!!!!
शेवटी एकच मागणे देवाला, सुखी ठेव माझ्या आप्त जनांना
देऊनी माझं आयुष्य, दीर्घायू कर त्यांना,
माहेरची लाज बाळगून, सासरची लक्ष्मी व्हायचंय मला
अभिमान आहे मुलगी असण्याचा, अजून खूप काही करायचंय मला,
मी म्हणजे मीच... एक मुलगी!!!!