तुच तुझी सोबती.....,
तुच तुझी सोबती.....,
कितीही असला प्रवास खडतर
पार करायचा असतो होउन निडर,
येतील संकटे पदोपदी फार
मात देवून जिंकायचिए वॉर....!!!
तूच तुझी सोबती......,
जन्म घेतलाय एकटीने
संघर्ष सोसायचेत दुपटीने,
येऊ दे अडचणी अपार
पण तू भक्कम रहा फार....!!!
तूच तुझी सोबती.......,
जिद्दीने आणि मेहनतीने हो खूप मोठी
अख्या जगाला दाखव तू तुझी कीर्ती,
आता म्हटलेच पाहिजे सगळ्यांनी हवी आहे मुलगी
तीच आहे खरा वारसा ह्या कुटुंबाची.....!!!
तूच तुझी सोबती........,
मुलगी असते प्रेमळ, स्वभावाने शांत
कधीच नका बघू तुम्ही तिचा अंत,
लक्ष्मी आहे घरची ठेवा हे तरी भान
तीच ठेवेल तुमची गर्वाने उंच मान.....!!!
तुच तुझी सोबती.........,
