व्हायचे नव्हते तेच झाले
व्हायचे नव्हते तेच झाले
नकळत का होईना, पण माणसाने त्रास दिला ह्या सृष्टीला
कधी जाणून बुजून, तर कधी नकळत
पण आपण खूप दुखावलं, ह्या धरनी आईला!!
वारंवार समजावले तिने, आम्हा अशिक्षीतांना
माणुसकीने वागा म्हणून धडे दिले आम्हाला,
शिक्षित असूनही आम्ही दुखावलं , ह्या धरणी आईला!!!
खुप सहन केले तीने , आमच्या ह्या स्वार्थी जीवनासाठी
पापी झालो आम्ही, आमच्या ह्या स्वार्थासाठी,
हे स्वार्थी जिवन जगताना, आम्ही खूप दुखावलं धरणी आईला!!!
वृक्षतोड, पशू हत्या, हे तिचेच बहुमोल अंग
बघुनी हे पाप सारे, नियती झाली दंग
कधी हो सुधारणार ही माणूस जात,
स्वार्थासाठी केला त्याने नियतीचा घात!!!
