जीवन गाणे गातच रहावे....
जीवन गाणे गातच रहावे....
जीवन गाणे गातच रहावे सुखात ओथंबुनी
हाच असतो मंत्र सुखाचा घ्यावे मस्त जगूनी
मिळते जीवन ज्यांस, तो असतो भाग्यशाली
भाग्यवान खरा तो त्यावर कृपा देवाची झाली
जीवन गाणे गातच रहावे....(१)
सुख दुःखाचे पैलू म्हणजेच जीवन असते
वास्तववादी जगणे ह्यातंच यथार्थ असते
जगतानाही जीवन, निस्वार्थी वृत्ती असावी
कार्य कुठलेही असो, अपेक्षा फळाची नसावी
जीवन गाणे गातच रहावे....(२)
जगण्याला खरा अर्थ मात्र तो असावा
येथेच मिळतो आपल्या मनाला तृप्त विसावा
जीवन मिळते एकदाचं हे कळावे प्रत्यक्षात
म्हणून जगावे हेच जीवन पूर्णपणे आनंदात
जीवन गाणे गातच रहावे....(३)
