STORYMIRROR

Rutuja Thakur (Pawar)

Others

4  

Rutuja Thakur (Pawar)

Others

ती खुप आनंदात होती....

ती खुप आनंदात होती....

1 min
301

अगदी घट्ट असे आमचे नाते झाले

 माझ्या वाचून तीला करमेनासे झाले

तीच्या गर्भात मी होती फक्त गोळा मांसाचा

पण तिच्यासाठी मात्र मी होती एक अंग शरीराचा

ती खूप आनंदात होती

कारण तीच्या गर्भात मी होती........


हळूहळू नाते आमचे घट्ट होत गेले

तिची अन् माझी नाळ एकच, हे समजत गेले

माझ्यासाठी असंख्य असे स्वप्न तिने पाहिले

तेव्हा कुठे जाऊन देवाने मला तीच्या पदरात टाकले

ती खूप आनंदात होती

कारण तीच्या गर्भात मी होती.......


गर्भात तीच्या माझी हळूहळू वाढ होत गेली

तीच्या माझ्या प्रत्यक्ष भेटीची वेळ जवळ येत गेली

माझा स्पर्श आता तीला स्पष्टपणे जाणवू लागला

आणि तिचा आनंद आता गगनात

म्हावेनासा झाला

ती खूप आनंदात होती

कारण तीच्या गर्भात मी होती.......


विलग होऊनी नाळ आता जन्म झाला माझा

गर्भात होते मी तीच्या आता संपर्क झाला बाह्यजगाचा

कुशीत होते तीच्या तेव्हा जणू धन्य झाले मी

खरे आईपण काय असते हे जवळून पाहिले मी

ती खूप आनंदात होती

कारण तिच्या गर्भात मी होती.......


स्वप्न झाले आता पूर्ण तिचे, प्रत्यक्ष बघुनी मला

किमया आहे हि देवाची हे तेव्हा कळाले मला

आई -मुलीचे नाते अमुचें आता जगजाहीर झाले

मान मिळाला लक्ष्मीचा मज, हे तिच्यामुळे शक्य झाले

ती खुप आनंदात होती

कारण तिच्या गर्भात मी होती.......


Rate this content
Log in