निसर्ग किमया
निसर्ग किमया
नदीला आला पूर मनात एक गोड हुरहुर
दुथडी भरून वाहत आहे नदी ओढ लागली तिला दर्या भेटणार कधी
अथांग सागर, उधाण लाट नदीला सामावुन घेण्याची पहात आहे वाट
शालू घातला धरतीने हिरवा शीळ घालून वाराही राग गाऊ लागला मरवा
उंच काळ्याभोर डोंगराला धबधब्याने घातला वेढा नयनरम्य दृश्य बघण्यासाठी जीव झाला वेडा
फुलांचा सुंगध दडला दर्याखोर्यात मोरही नाचू लागले थुईथुई तोर्यात
बघून मोराला लांडोरही लागली नाचू नकळत टवटवीत मनात जमले हिरवेगार पाचू