सण दिपावली
सण दिपावली


दारात उभे गाय पाडस
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस
प्रेमाने खाउ घाला तिला गोग्रास
तेहतीस कोटी देवांचा तिच्यात वास
धनतेरस दिवस दुसरा धणेगुळाचा
प्रसाद ठेउनजपा प्रसादाचा वारसा
सुगंधी उटणेआजीचा कल्ला
उठा उठा कि दाखवू लाटणे
पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात
पहाटेच्या अंघोळी अंगणातल्या
तुळशीपुढे सजली रंगांची रांगोळी
लक्ष्मीपुजनाची केली आरास
कुबेराबरोबर लक्ष्मी आली
झाला क्षणभर भास
पाडवा सण वाढवतो
पतीपत्नीचे नाते गोड
भाउबीजेला माहेरी जायची ओढ
माहेरची सावली घनदाट छाया
सासरमाहेर सुखात ठेव ही वेडी माया ॥