मौज ....दिवाळी फराळाची
मौज ....दिवाळी फराळाची


रव्याचे खव्याचे लाडू गोल गरगरीत
सजले बशीत बघुन करंजी आली खुशीत
पुरी गाल फुगवुन बसली शंकरपाळी तुपात तरंगत हसली
चिरोटे मस्त साखरपाकात दंग चिवड्याने केला सगळ्यांशी संग
येताजाता खाता मला चकली शेव म्हणाले नको दाखवू तोरा दिवाळीत आम्हाला जास्त भाव देतात पोरा
फराळाची चव भलतीच न्यारी सगळे खाऊचे डबे होतात खाली
लागली पैज तिखट गोडाची, कोण होते आधी फस्त चिल्लीपिल्ली म्हणतात दिवाळीचा सण मस्त ॥