दिपज्योती नमोस्तुते
दिपज्योती नमोस्तुते


घराघरात सजली समई, निरांजन घासुनपसुन
घंटी शंख बघत होते हसुन हसुन
हळदकुंकू अक्षता, फुलं वाहीले
सुगंधी अगरबत्ती धुप लावले
दिव्याची पुजा संध्याकाळी
प्रार्थना एक दिवा रोज सजलेला राहू दे आरतीच्या वेळी
तिमिराचा करतो नाश
इवल्याश्या ज्योतीचा पडतो प्रकाश
मनापासुन नैवेद्य खीरपुरी ठेवते तुला
सहस्रकिरण सुर्यदेवतेला औक्षण करायला
तेवत राहू दे घराघरातला दिवा ll