|| वैशाखाची देणगी ||
|| वैशाखाची देणगी ||


कोकीळेच्या कुहुकुहु स्वरांनी दुमदुमली झाडी
आंब्याच्या फळांनी नटली वाडी करवंदाची पिकली जाळी टोपलीत दिसू लागली जांभळं जांभळी काटेरी गोड फणस झाडावरती लटकला काजुगरातील काजू गरामधे अडकला चटकमटक खावेसे वाटू लागले चिंचेचे बुटूक काचेच्या प्याल्यात कैरीचे नटूनथटून पंचफळांनी सजली ताटं आजोबा म्हणतात आजीला अगं थोडी कैरीची डाळ वाट जिभेचे चोचले झाले सुरू भरपुर आंबा खाऊन पोट भरू मोगरा, चाफा, मरवा फुलला बाजार श्वासात भरला सुगंध, मनाला आली टवटवी, पळून गेला आजार निसर्गाची किमया जादूगार,हिरवीगार झाली धरती सिमेंटची बिल्डींगजाळे नका पसरवू तिच्यावरती ॥सौ शोभा संजय बावधनकर