॥ पर्वणी अक्षय तृतीयेची ॥
॥ पर्वणी अक्षय तृतीयेची ॥


अक्षयतृतीया हे महान पर्व ज्याची ख्याती
शिवरायांची जन्मतिथी, अभिमानाने फुलते छाती
प्रत्यक्ष भवानीमातेने बहाल केली तलवार
प्राण पणाला लावून जिंकले गडकिल्ले वारंवार
जमदग्नीने केली परशुरामाला आज्ञा,
कर शिरच्छेद, उडव आईचे छत्र
पितृआज्ञा पालन करून धन्य झाला पुत्र
प्रकट झाली रेणुकामाता, प्रसिद्ध झाले माहूर क्षेत्र
ब्राम्हणाला सत्पात्री करा धान्य दान
गाईला हिरवा चारा, चणेगुळाचा मान
देवापुढे नैवेद्य पंचपक्वानांचा थाट
पाण्याची पुजा, भरा नवा लाल माठ
पुर्वजांच्या पुजेने लागेल महान पुण्य
क्षय ज्याचा नाही असे करावे लागेल मान्य ॥