पहिला पाऊस
पहिला पाऊस
पहिला वळीवाचा पाऊस पडला खराआतुरतेने दरीतुन वाट काढत उसळला झरा
नदीला भेटण्याची त्याची हुरहुर तिला मात्र सागरात व्हायचे एकरुप
सागराला आल्या उधाण लाटा प्रेमाचा बहर जमला साठा
धरतीने पांघरला हिरवा शालू पागोळे दिसू लागले पाचू
पहिला पाऊस निसर्गाला प्रेमाने घालतो न्हाऊ प्रियकर प्रेयसीची लाडीक कुजबुज, टपटप काय वाजते ते पाहू