सय ...फक्त पितृपक्षासाठी
सय ...फक्त पितृपक्षासाठी


नको घालू श्राद्ध, नको आठवणीत ठेऊ पक्ष
जिवंत होते आईवडिल, दिले नाही लक्ष
म्हातारपणी धरला नाही कधी हात आता पत्रावळीवर ठेवतो दहीभात
तरुणपणी डोळ्यावर होती धुंदीआता कावळ्याला बोलावुन खा म्हणतो साजुक तुपातील बुंदी
होता रक्तदाब होता मधुमेह, खाउ दिले नाही पोटभर द्रोणामधे आठवणीने ठेवतो तु आमटी कढी घोटभर
आईने हाक मारली तर खेकसायचे जोरात आमच्या नावांने तिथीला दानधर्म करतो तु घरात
अरे जिवंतपणी हे केले असते तर मिळाली असती मनशांती तुझ्या नाटकी वागण्याने होते आता वांती
जिवंतपणी काढा डोळ्यावरची पट्टी, नका नशा चढू देऊ
तु कसाही वागला तरी मोठ्या मनाने तुझ्या डोक्यावर आशीर्वादाचे हात ठेऊ ॥