नवरात्रीचे नवरंग
नवरात्रीचे नवरंग


घरोघरी बसले घट, हिरव्यागार धरतीला दुर्गेची लागली चाहुल
पैंजण घालून पडले पाउल घटापुढे अखंड दिवा प्रकाशाच्या झोतात विषय नवा
रोज माळ पराक्रमाची, दैत्याचा संहार तरूण तरुणींची नवी साडी, रोज नवा शृंगार
पहील्या माळेला दुर्गामातेने घातली पांढरी साडी नउ दिवस सुखाने भरली गाडी
दुसर्या माळेला ऒटीला खण लाल देवीचे आरक्त झाले गाल
तिसर्या माळेला पैठणी हिरवी तोर्यात उभी दुर्गागौरी
बालाजीस्वामींनी पाठवला पिवळा शालू अंगावर खुलला विजयाने गुलाल उधळा
प्रसादाला बत्तासे चणे निळासावळा पावा वाजवतो भजनगाणे
प्रभा फुलली रंग गुलाबी लाल, टवटवीत झाली पहाट
मळवट भरुनी भांगी शेंदुर लावुन, अभिमानाने वाघावर आरुढ होउन धरली स्वर्गाची वाट ॥