गुरूवंदना
गुरूवंदना


गुरू ही दैवी शक्ति खरोखर
धरा गुरूंचे बोट,चाला बरोबर
आवडते गुरूंना मानसपुजा
करतो मनापासून
भक्त भोळा विनवितो घ्या ना चंदनाच्या पाटावर बसून
लावूद्या कपाळी केसरी टिळा
चरणी लावतो अत्तर कितीतरी वेळा
प्रसादाला पुरणपोळी खीर
पुजा आवडू द्या, प्रसन्न व्हा रघुवीर
गुरूंच्या गाली हसू आले, नयनी पाणी
कानात कुजबुज अरे वेड्या नामस्मरणांत रंगू दे तुझी वाणी
आनंद झाला मनी, कान झाला धन्य
मिळावा गुरूंचा आशीर्वाद लाभेल पुण्य
करतो भजन, वाजवतो टाळ चिपळ्या
अर्पण करतो गुरूचरणी मनाच्या कमळ पाकळ्या
पाकळ्यांमध्ये भरला सुगंध, नवल काय
सदैव स्मरणात राहू दे सद्गुरूंचे पाय ॥