STORYMIRROR

Priti Dabade

Inspirational Others

3  

Priti Dabade

Inspirational Others

ऑनलाईन शिक्षण

ऑनलाईन शिक्षण

1 min
257

बंद झाली

नेहमीची शाळा

अभ्यासाचा झाला

कमी लळा


कधीच नाही

विचार मनात

घरातून होईल

शाळेची सुरुवात


ना मित्र-मैत्रिणी

ना खेळ

नुसताच दिवसभर

अभ्यासाचा मेळ


पोटदुखीचा बहाणा

करता येईना

अभ्यासाला सुट्टी 

दिली जाईना


खोड्या बडबड

ना हालचाल

शाळेतली हरवली

ती धमाल


कधी तुटतो

संपर्क मध्येच

जातो मग

रस लगेच


ऑनलाईन शिक्षण

गरज काळाची

नवनवीन तंत्रज्ञान 

अवगत करण्याची


लवकर शाळा

भरू दे

मजेशीर दिवस

पाहू दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational