STORYMIRROR

Savita Kale

Inspirational

3  

Savita Kale

Inspirational

गुरूंचा महिमा

गुरूंचा महिमा

1 min
68

पृथ्वीतलावरचा ईश्वर

म्हणजे आपले गुरू

घडवले सकल आयुष्य ज्यांनी

त्यांना नित्य आपण स्मरु


महिमा त्यांचा अगाध किती

वर्णाया शब्द पडती अपुरे

गुरूविना जीवन म्हणजे

वाटे सारे सुने अधुरे

 

कुंभार घडवितो घटास तसे

गुरूठायी घडतो आपण

काय, किती आपणास दिले

अशक्य आहे मापन


गरुडझेप घेण्याची जिद्द

रक्तात निर्माण केली

संघर्षाला तोंड देण्याची

वृत्ती अंगी बाणवली


गुरुदक्षिणा ती काय द्यावी

प्रश्न पडे मनाला

माझे सारे आयुष्य अर्पण

माझ्या श्री गुरूचरणाला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational