मुखवटा
मुखवटा


रोज नवा मुखवटा
कोणता खरा मानावा
खोट्या साऱ्या भावना
अन खोट्याचं साऱ्या जाणिवा
नाव नेतो किनारी
भाव दाखवी असा
मग पैलतरी जाण्याआधीच
घात सागरी होतो कसा
खेळ शब्दांचे करूनी
खेळतात रोज मनाशी
टोचतात रेशीमगाठी
घाव होतो खोल तळाशी
गुंतल्या होत्या भावना
पण क्षण स्तब्ध आज जाहले
एकाच माणसाचे जेव्हा
मी अनेक मुखवटे पाहिले....