ओढ पावसाची
ओढ पावसाची
कधी येशील रे मेघराजा तू भेटाया अवनिला
किती रे ओढ तुझी या वेड्या मनाला।। धृ।।
निरभ्र आकाशाखाली ताऱ्यांच्या दुलईत गाढ झोपले होते
हलवून उठवत मला, झोपतेस काय आलोय न मी, त्यानं म्हटले होते
किलकिल्या करुन मीही पाहिले, चांदण्या नाही तर आभाळ दिसलं डोळ्याला.....1
वाट पाहात होतीस न आतुरतेने, म्हणूनच आलोय त्यानं म्हटले
दोन थेंब पाण्याचे पडले हातावर, अन् खाडकन डोळे उघडले आनंदाने मोहरले,
पाहिले समोर मिश्किलपणे हसताना त्याला......2
बरं झाले बाबा आलास तू हुश्श आता वाटते
किती आस्थेने तुझी सारे वाट पाहात होते
वाट&n
bsp;पाहून पाहून बळीराजा तर फारच थकला......3
आता मात्र नजर तुझी सर्वांवर असू दे
मला मात्र तुझ्या सरींमध्ये आनंदाने भिजू दे
अंगावर झेलत तुला मलाही आवडतं सुसाट धावायला.......4
आवडतं भिजायला जेव्हा तू धबधबा होऊन कोसळतोस
वेड्यासारखा पडतोस जेव्हा, वाटतं रागच काढतोस
जाताना सोबत गावं न माणसही, घेऊन जातोस कशाला........5
जितकी ओढ आहे तितकीच भितीही मनाला नेहमीच राहते
येण्याने तुझ्या जीवन फुलते, सृष्टीही बहरते, हिरवळ पसरते
जीवन तुझ्यावाचून शून्य शून्य वाटते रे या अवनीला.....6
किती रे ओढ तुझी या वेड्या मनाला...