शिव छत्रपती
शिव छत्रपती

1 min

37
होता त्यांचा कणखर बाणा
नी होती निर्भिड छाती,
घेऊन भवानी देवीची शपथ
अखंड स्वराज्याचे घेतले होते स्वप्न हाती.
होते मुठभर मावळे
पण बुलंद होती त्यांची जिद्द,
होता छाताडावर घ्यायला लाखो वार
निर्भिड तेने आमचा राजा सिद्ध.
रेखूनी अपुले अष्टप्रधान मंडळ
आदर्श चालवला होता राज्यकारभार,
काय होत त्यांच्यात काय माहीत
घेतले होते मावळ्यांनी छताडवार बाण आर- पार.
राज्यासाठी प्राण ओवाळून टाकणारी
मुठबर मावळ्यांना घेऊन होते ते लढले,
अखेरच्या श्वासपर्यंत अखंड स्वराज्याच्या
स्थापनेचे पर्व होते ते चढले.
नको वाटतो फक्त दिखावा
अजमावी वाटते त्यांची कार्यपद्धती,
तेव्हाच हक्काने निघेल
हृदयातून येऊन ओढांवराती शिव - छत्रपती.