समाज
समाज


काळोखाच्या रात्रीतील भासणाऱ्या आभासा सारखा,
जग जिंकायच्या वाटेवर असला तरी मनाने हारखा.
आसमंताला स्पर्शवयच्या प्रयत्नांच्या झाडाला उंच पाठवणार,
मुळा ला मात्र वाळवी प्रमाणे पोखुरून टाकणारा,
आपल्या दुःखात दुखी असून मनाने हसणारा,
मनाच्या द्वंद्वात भावना च्या नैतिकतेने फसवणारा.
मलाही कधी कधी वाटते भीती समाज्यात जगताना,
रात्रीच्या काळोखात नव्हे तर माणसांच्या झुंडीत चालताना,
किर्र शांततेतून नव्हे तर माणसांच्या कर्कश्यातून जाताना,
आपल्या नजरेतून नव्हे तर त्यांच्या नजरेने जग पाहताना.
समाजाच्या चालीरीती कधी पटतात तर कधी मनाला पेटवतात,
त्याच्या विचारांच्या तप्त किरणांनी सागराला ही अटवतात.
समाजाच्या विचारांचा विचार करण सोडायचाय,
स्वतः च्या भरारीसाठी त्यांच्या बंधनना मोडायचाय,
स्वच्छंदपणे उडताना मर्यादेचे कूपन तोडायचाय,
दुसऱ्यासाठी जगताना जरास स्वतःसाठी पण जगायचय.