STORYMIRROR

Monali Divate

Others

3  

Monali Divate

Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
41

कधी रिमझिम तर कधी 

मुसळधार पणे त्याच धरतीवर कोसळण,

अनंत आसमतातून येऊन धरतीच्या

कणाकणात त्याच मिसळण.


येतो तो कोमेजून गेलेल्या सृष्टीला

नवा चैतन्य करायला अर्पण,

तुडुंब पणे वाहतात नदी नाले 

मोडून त्यांचे सर्व दर्पण.


तो कोसळतो नी करतो

धरतीच्या कणा- कणाला स्वच्छंद,

नव्याने कोसळला रोज तरीही

स्मरणी येतो पहिल्या सरीचा तो गंध.


होते नवीन सूरुवत अनेक 

जीवांची नव्याने जगायची,

मलाही काही औरच वाटते

 गंमत ह्या पावसाच्या सरित भिजायची.


पाहायला भारी वाटत तुडुंब

भरलेले डबके नी रस्त्याने पाळणारे पाणी,

मी आजकाल फक्त पाहते 

वाटत पूर्वीसारखं लहान व्हावं आणि.


वाटत वाहत्या पाण्याबरोबर 

आपणही जावं वाहत,

शाळेतून घरी येताना फेसाळून

वाहणाऱ्या त्या ओढ्याला पाहत.


तो कोसळतो बेदुंधपणे डोळ्यासमोर

नी कोसळतात अनेक आठवणी डोळ्यामध्ये,

आमचं बालपण ना टीव्ही ना मोबाईल

फक्त अडकलेला होत त्या कागदी होड्यांमध्ये.


Rate this content
Log in