Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Monali Divate

Classics Others

3.6  

Monali Divate

Classics Others

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
27


कधी रिमझिम तर कधी

मुसळधारपणे त्याचं धरतीवर कोसळणं,

अथांग आसमंतातून येऊन

धरतीच्या कणाकणात त्याचं मिसळणं


येतो तो कोमेजून गेलेल्या सृष्टीला

नवचैतन्य करायला अर्पण,

तुडुंबपणे वाहतात नदी-नाले

मोडून त्यांचे सर्व दर्पण


तो कोसळतो नी करतो 

धरतीच्या कणा-कणाला स्वच्छंद,

रोज कोसळला तरी स्मरणी

येतो तो पहिल्या सरीचा तो गंध


होते नवीन सुरुवात अनेक

जीवांची नव्याने जगायची,

मलाही काही औरच वाटते

ती गंमत या पावसाच्या सरीत भिजायची


पाहायला भारी वाटतं तुडुंब भरलेले

डबके नी रस्त्याने पाळणार पाणी,

मी आजकाल फक्त पाहतच असते

वाटतं पूर्वीसारखं लहान व्हावं आणि


वाटतं वाहत्या पाण्याबरोबर

आपणही जावं वाहत,

शाळेतून घरी येताना फेसळून

वाहणाऱ्या त्या ओढ्याला पाहत


तो कोसळतो बेधुंदपणे डोळ्यांसमोर

नी कोसळतात अनेक आठवणी डोळ्यांमध्ये,

आमचं बालपण ना टीव्ही ना मोबाईल

फक्त अडकलेलं होतं कागदी होड्यांमध्ये


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics