ओढ पावसाची
ओढ पावसाची


तडाडलेल्या भुईला स्वतःचा आसवांनी स्पर्शवून,
येतो विस्फाट मैलावरून नी परततो तिला हर्शवून.
तो आला की तिचं चैतन्य आसमंत जात दरवळून,
जणू भासत पहिल्या भेटीनंतर जाताना पाहते ती मागे वळून.
दोघांच्या मिलनाची चोहीकडे पसरते चाहूल,
जणू भासत नव वधूच सासरी पडावं पहिल पाऊल.
रिमझिम तर कधी धो -धो पने त्याच धरतीवर कोसळनं,
जणू भासत आसमंताच नी ह्या भुईच एकत्र मिसळण.
त्याच्या आगमनाची तिच्या मनाला लागलेली निरंतर ओढ,
जणू भासत दोघांच्या भेटीन होतय तिचं पूर्ण स्वप्नच जणू गोड,
तरीही ह्या भुईला नित्य वर्षी लागलेली असते त्या पावसाची ओढ.