STORYMIRROR

Vasudha Naik

Inspirational Others

3  

Vasudha Naik

Inspirational Others

आला श्रावण श्रावण

आला श्रावण श्रावण

1 min
162

आला श्रावण श्रावण

आल्या पावसाच्या सरी

चिंब चिंब भिजूनी

शहारली ही खोल दरी...


आला श्रावण श्रावण

ऊन-सावलीचा खेळ

पावसाचा लागत नाही

कधी कधी मेळ...


आला श्रावण श्रावण

धरणी सजली नटली

हिरवाईने मुक्त न्हाली

पावसात चिंब भिजली...


आला श्रावण श्रावण

रानोमाळ फुलला

रंगीबेरंगी फुलांनी

पथ दुतर्फा सजला...


आला श्रावण श्रावण

माहेरवाशिण चालली

माहेरास जाताना हो

ती नवा शालू नेसली...


आला श्रावण श्रावण

हा मास आहे सणांचा

खूप खूप हर्षाचा

सार्‍याच माहेरवाशिणींचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational