लहानपण देगा देवा
लहानपण देगा देवा


नियतीचा हा निराळा खेळ
बालपणाची आहे सुंदर वेळ
कपाटावर चढायचे, चेंडूने फोडायच्या खिडकीच्या काचाखोड्या करायच्या कशाही, आजोबांची दमदाटी, काढा उठाबशा
जातायेता कुणालाही मारायच्या टपल्या खोट्या अफवा पसरवायच्या, शेजारच्या काकू खपल्या
नाकी नऊ आणायचे, खेळून सापशिडी, बुद्धीबळथकून आजोबा म्हणायचे घे चॉकलेट गोळी, सवंगड्यांबरोबर खेळ पळ
आजीला दाखवायच्या वाकूल्या हट्ट करायचा दे आत्ताच्या आता करून वरणातल्या चिकूल्या
आईचा आरडाओरडा कानीकपाळी उड्या मारत आनंदाने मारायची टाळीवर टाळी
चोरून खायचे शिंकाळ्यातले दही विचारले तर सांगायचे माहीत नाही
बालपणीच्या आठवणींने रहाते ताजे मन विसरता कधी नाही येणार हरवलेले बालपण ॥