STORYMIRROR

Prakash Chavhan

Abstract

3  

Prakash Chavhan

Abstract

दिवा दिवाळीचा

दिवा दिवाळीचा

1 min
264

*तरुतरूंच्या वाऱ्यात 

ज्योत जिवांची चालली*

*आली दिवाळी अंधारी 

मळभ हटवाया मनाचें*

*ज्ञानदीप मतीचे उजळून 

येती घरा आनंद पर्व*

*पगडा मर्यादेचं तसं 

धर्म अधर्माच्या गावातं*

*तें ही दिस येतीलं 

शोध घेऊ जगण्याचं*

*वैभव बघू रें जिव्हाळातं 

चार दिसांची ही चांदणी*

*दिवा अंगणोअंगणी लावू

वुक्ष भूमायेच्या पदरी*

*दिवा शांतीचा धरू

हे ही दिस जातील*

*लागेल दिवा आठवणीचा 

कधी मागचा कधी पुढचा*

*सय येतं राहील मनातं 

ज्या घडीला भेटतील मित्र*

*खुलली भावना हुर्दयाची 

विसावलं सुख मनोमनी*

*दिवा दिवाळीचा असा 

भावंबंध प्रेमाचं आलेला*

*लक्ष लक्ष दिव्यांनी

 उजळू दे आकाश*

*संहार कर दीपदेवा 

पापी दुष्ट शक्तीचा*

*मिळो सर्वांना भव्यता     

 पाऊलवाटेचा प्रकाश*

*असा साजरा होवो आपला

 सर्वांचा दिवाळी सण खास!*

====****====****====


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract