STORYMIRROR

Sarika Jinturkar

Abstract

3  

Sarika Jinturkar

Abstract

सांगता सांगता सारं

सांगता सांगता सारं

1 min
211

सांगता सांगता सारं

खूप काही वगळावं लागतं  


फुलांना सुद्धा फुलतांना

काट्याचं दुःख लपवावं लागतं 


मनाला वेदना झाल्या तरी 

हास्य ओठी फुलवाव लागतं  


काळजातल्या खोलवर जखमांना

 अज्ञातच ठेवावं लागतं  


सद्गुण शोधताना अवगुणांना 

बाजूस सारावं लागतं


चंद्राची स्तुती करताना सुद्धा 

डागास काळ्या विसरावं लागतं  


भविष्याच्या उज्वल वाटेसाठी 

वर्तमानात जळावं लागतं 


अश्रूत भिजलेल्या शब्दांना 

सुरांनी सजवावं लागतं  


या जीवनाचं मोल देतांना 

खूप काही सोसावं लागतं  


हळूवार कोमल भावनांना

स्वतःचं कठोर बनवावं लागतं  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract