STORYMIRROR

Umesh Dhaske

Abstract

3  

Umesh Dhaske

Abstract

स्वल्पविराम

स्वल्पविराम

1 min
213

स्वल्पविराम लावला की

माणसांतील माणूसपण 

कमी होतं....

तुझं माझं माझं तुझं

करीत सगळंच संपून जातं.......!


स्वल्पविराम जिथं तिथं

धर्माधर्मात जाऊन बसतो

तेव्हा प्रत्येक वेळी

जातीवादी

नव्यानं जन्म घेतो........!


स्वल्पविरामामुळेचं जेव्हा जातींचं

वादळ सुशिक्षित समाजात

थैमान करताना आम्हाला दिसतं..

तेव्हा माणसाला माणसाची नाही

तर हैवानाची जात समजलं जातं.......!


स्वल्पविरामुळेच एकमेकांची

मंदिरं पाडण्यासाठी अन गळे

चिरण्यासाठी आम्ही शस्रांचा अन

अस्रांचा बाजार मांडलाय..

सांगा आता शिवराय भिमराय

किती जणांच्या डोक्यात शिरलाय....?


विचारातला मतभेद ह्या

स्वल्पविरामानेच घडविलाय

दंगलीत जाळपोळीत

जातीवादयांनी

कुणाकुणाचा धर्म रडवलाय ?


स्वल्पविरामाला अाता 

देऊ इथं मूठ माती...

तरचं तयार होतील सार्‍यांत

एकमतांची नाती......!


शिवाजी शाहू फुले अांबेडकर

ह्यांच्यातील स्वल्पविराम काढा

त्याच्याजागी तिथं फक्त 'अधिकच' चिन्ह घाला....!


जोडली जातील मग सगळी एका अधिक चिन्हानं

वाढली जातील मग सगळी एकाच

विचारानं

घडली जातील मग सगळी एकाच 

मतानं

सुंदर दिसेल मग माझा भारत

एका सुंदर तिरंग्यानं.......!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract