STORYMIRROR

Umesh Dhaske

Romance

3  

Umesh Dhaske

Romance

प्रित...!

प्रित...!

1 min
224

चांदण्यांच्या रातीला

प्रित माझ्या साथीला

स्मित हास्याने तुझ्या

गंध जणू मातीला....!

 

थबकती पाऊले

का उगाच आता

कोसळती शहारे पुन्हा

तुझ्या मिठी जाता...!


बोलक्या पापण्या

नयन सांगती खुणा

अबोल ओठांची भाषा

कळते मला पुन्हा...!


ती रात्र अशी

वेढावली आता

भन्नाट सैर वारा 

छेडावितो तुला...!


कुंतलाची बट कोवळी

गाली बहरुन आली

प्रितीची गोड लाली

चिंब आज झाली....!


अंधारात रातीच्या

काळोख चिंब झाला

प्रेमाला पावसाने

वेगळाच रंग आला...!


तू अशी चिंब ओली

मिठीत शहारलीस

पुन्हा एकदा माझ्या

प्रितीत तू लाजलीस....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance