प्रेमा...
प्रेमा...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
अंतरात अगाध वसलास
मनांमनांवर तुझाच ठसा,
निराकार रूपात वावरतोस
प्रेमा तुझा रंग कसा.....
जिथे-जिथे छाया तुझी
मनाच्या गावी वसतसे तसा,
आयुष्याच्या रंगमंची
प्रेमा तुझा रंग कसा....
लाल रंगास म्हणती प्रेमाचा
रक्तांत भिनलेला तू असा,
विलग करणे अशक्य तुज
प्रेमा तुझा रंग कसा....
असशी तू जिथे-जिथे सदैव
स्वच्छ भासतो जीवन आरसा,
रमणीय तेच क्षेत्र असता
प्रेमा तुझा रंग कसा....
ना रंग,ना रूप,ना आकार
जाणिवेचा स्वर्गसुखी वसा,
शोधार्थ तुझ्या सदा भटकते मी
प्रेमा तुझा रंग कसा....
"तू तिथे ईश्वर" जोडी एक समान
दोघे निराकार सावरती माणसा,
हृदये भरून जाऊ दे अशी
प्रेमा तुझा रंग कसा....
🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷

