प्रेमात रंगलो मी
प्रेमात रंगलो मी
ती गोड आठवण आहे मज नयनी
रंगात लुप्त होतो जेव्हा मी अन्
तुझ्या प्रेमरंगात मी पार रंगून गेलो
कधी कळलेच नाही तुझ्यात सामावून गेलो
होळीचा तो सण अलिंदात मी साठविला
या हि वर्षी तुला मनोमय पत्र मी पाठविला
ते शाळेचे दिवस येताच क्षणी
हृदयातुनी हुंदके अन अश्रुंचे पूर नयनी
तुझ्या प्रेमरंगात एकटा रंगून गेलो
देहभान माझे मी हरपून गेलो
तुझ्याविना नाही हे माझे हि जीवन
हिंडतो मी रानोवनी आठवणीत वणवण
हे प्रिये विरह आता सोसेनासा झाला
आठवणीत तुझ्या माझा आयुष्य काळ चालला
हे परमेश्वरा का केलेस आम्हा तू वेगळे
प्रेम पक्षी विहार का केले आम्हा बंदिस्त बगळे
विरहाने तिच्या मन माझे लाहीलाही
होळीच्या दिनी प्रेमाचे रंग उधळतो दिशा दाही

