संत रोहिदास महाराज
संत रोहिदास महाराज
पिता संतोरदास बहु पुण्यवान
आई कळसादेवी बहु भाग्यवान
पोटी पुत्र जन्मला हिऱ्यासमान
माता पित्यास हर्ष दैदीप्यमान
गुरुवर्य संत रोहिदास
तुम्ही अंतर मनातील श्वास
आम्हला लागली तव भक्तीची आस
जन्म तुमचा होण्या अनिष्ट रूढीचा नास
संत कबीर समकालीन तव मानसबंधू
दयानिधी रविदास बहु कृपासिंधू
कठोतात अवतरली माय गंगा
दिला उपदेश ठेवा अंतर्मन चंगा
विनलाय रविदासांनी एकतेचा धागा
करा तुम्ही तुमच्या आत्म्यातील देव जागा
सन्मार्ग आणि सद भक्तीने लागा
बंधुभाव अन समतेने वागा
दीन दुबळ्यांच्या जीवना देण्या नवं आकार
अवतरले महान संत रूप घेऊन चर्मकार
जाहला समाजवादाचा नवं साक्षात्कार
जन्मला या भूमीवरी वैचारिक शिल्पकार