प्रेम पालखी
प्रेम पालखी
हे प्रकाशाची राणी
अंधाऱ्या कोठडीतला
मी इवलासा काजवा
होशील का ग माझी अर्धांगीनी ? ।।
जरी मी मिणमिणता काजवा
जेव्हा तुझे राज्य अस्त होईल
तेव्हा अंधारात मी तुझी साथ देईल
प्रकाशात तुझी अन अंधारात माझी
एकमेकांना मिळेल साथ ।।
जरी मी इवलासा
माझी प्रीत बहू मोठी
प्रेमनदी नसते कधीच लहानमोठी
style="color: rgb(0, 0, 0);">अंधारात मिणमिणणार रूप
अनेकांना आहे ते आवडीचे खूप
तुलाही मी नक्कीच आवडेल
दे माझ्या प्रस्तावाला होकार
होईल माझे प्रेमस्वप्न साकार
दोघे मिळुनी खांदी वाहू
प्रेमरुपी पालखी
करू प्रेमभाषा बोलकी ।।
रचला जाईल इतिहास आपुला
निघेल जेव्हा आपुली
राणी प्रकाशाची अन
काजव्याची प्रेम पालखी ।।