STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Inspirational

3  

DATTA VISHNU KHULE

Inspirational

शब्दांची किमया

शब्दांची किमया

1 min
451

जाणुन घेऊया शब्दांची किमया

आम्हा पामराची आहे शब्दावरी माया

शब्द हीच धारदार  तलवार

शब्द बहु जहरी अवजार

शब्द माणसे जोडणारा दुवा

शब्द ज्यांचे गोड तोच सर्वांना हवा

शब्द हेची अनमोल रत्न

शब्दाचे जुळवा जुळवी असे बहु यत्न

वाढवावे आपले शब्दांचे भांडार

मिळेल आपुल्या काव्याला नवं आकार

शब्द आहेत अनेक ग्रंथाचे किमयागार

अनेक ग्रंथातूंनी घडतो शब्दांचा नवंसाक्षातकार

शब्द हेची अमूल्य धन

शब्दप्रभूंना मिळतो जगात सम्मान

शब्द हेची तीव्र बाण

ते वापरायचे असावी जाण

शब्द मुळाक्षरांची सुगम माळ

शब्द सूर निघतो घेऊनी मृदुंग ,वीणा अन टाळ

वारकरी करतो विठुरायाच्या गजर

जुळवुनी शब्दरुपी भावनेचा पाझर

कवी साहित्यिक करती शब्दरूपी  जागर

संत ज्ञाना,नामा, तुकयांची गाथाआहे शब्दांचा आगर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational