STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Others

2  

DATTA VISHNU KHULE

Others

आदर्श शिक्षक धातरकर सर

आदर्श शिक्षक धातरकर सर

2 mins
65

(विद्यार्थी जनांचे आवडते अन आदर्श शिक्षक धातरकर सर(एटी धातरकर सर)

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात असणारे छोटेसे गाव किनगाव जट्टू हे सरांचे गाव , भौतिक सुविधा चा अभाव असूनही एक सामान्य कुटुंबातील असून विद्यार्थी ते मुख्याध्यापक हा प्रवास खूप कठीण होता शब्दात मांडणे ते कठीणच पण मी त्यांचा विद्यार्थी असल्याने त्यांना जवळून अनुभवलं आहे.अतिशय गरिबी परिस्थिती तुन , घरची परिस्थिती जेमतेम मात्र शिक्षणाची आवड बालपणी मनोमनी सरांनी ठरवलं होतं की ज्ञान देण्याचे कार्य करायचे कारण जगात सर्वात श्रेष्ठ ज्ञान कोणतं असेल तर ज्ञान दान आहे , कुणी पैसा देईल पण ज्ञान देणार नाही , ती रूढ झालेली म्हण आहे पैसा द्यावा पण ज्ञान देऊ नये या म्हणीला फाटा फोडत सरांनी शैक्षणिक क्षेत्रात आपलं काम चालू ठेवलं , तो काळ खूप संघर्षाचा होता तरीही सरांनी त्यावर मात करून यशोशिखरावर जाण्यासाठी रस्त्यावर येणाऱ्या अनेक दगडं म्हणजे अडचणीला सामोरे जावं लागलं घरी सर्व मंडळी सरांना प्रोत्साहन देत असत यातूनच जिद्दीने , चिकाटीने आपले शैक्षणिक कार्य चालू ठेवलं ही अभिमानाची बाब मला नमूद स्वकरावीशी वाटते .

     माझा आणि सरांचा संपर्क इयत्ता सातवीपासून आला इंग्रजी आणि गणित अशा कठीण विषयावर सरांची जबर पक्कड होती,

गणित विषयांत असलेले अनेक बारकावे सर अगदी सोप्या पद्धतीने सांगत असत  यामुळे गणित विषयात गोडी निर्माण झाली , नेहमी सर मुलांना मार्गदर्शन करायचे गणिताचा सराव करून घ्यायचे . अशा पध्दतीने प्रवास चालू होता अगदी छान पध्दतीने सातवी संपली,

नवीन आठवी मध्ये प्रवेश झाला . सर आम्हाला वर्गशिक्षक होते सरांचा आठविला आम्हाला इंग्रजी या विषय होता . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी बद्दल न्यूनगंड होता पण सर अतिशय चांगल्या पध्दतीने विषय हाताळत होते  मी जो पाठ सर घेणार त्या पाठतील सर्व शब्द पाठ करायचो आणि सर मधून मधून पाठ अर्थ विचारायचे मी पटकन सांगायचे सर माझे कौतुक करायचे मला प्रोत्साहन मिळाले आणि इंग्रजी विषयावर माझं प्रभूत्व होऊ लागले , परिच्छेद वाचण्यासाठी सर मला उभे करायचे मी न अडखळत वाचायचो मी मनोमन ठवरलं होत की सर सारख इंग्रजी विषयाचे शिक्षक व्हावे  असे वाटायचे , काही काळ उलटला दिवाळी नंतर सरांची बदली होणार होती मनात अतिशय खेद झाला की सर आपल्या ला सोडून दुसऱ्या शाळेवर जाणार खूप रडलो सर आणि वर्गातील सर्व मुलांच्या डोळे पाणावले हा प्रसंग शब्दात मांडू शकत कारण भावनेला शब्द व्यक्त करणे गैर आहे सर्व विद्यार्थी खूप नाराज होते पण काहीच करू शकत नव्हते कारण शासकीय प्रशासनापुढे कुणाच चालत नाही सरांची बदली परतूर येथे झाली तरी अधूनमधून भेट होतं होती नन्तर सरांची नियुक्ती शिरपूर येथे झाली आणि त्यांचं कार्य पाहून त्यांना मुख्यध्यापक पदाचा कार्यभार आला अतिशय छान पद्धतीने कार्य चालू आहे सरांच्या हातुन। असच ज्ञान दानाच कार्य घडो हीच

ईश्वर चटणी पार्थना सरांबद्दल खूप लिहता येईल कारण गुरुची महिमा अगाध आहे ,गुरू हे साक्षात  परब्रम्ह आहेत , आणि त्यांच्या विषयी लिहायला माझी लेखणी अपुरी पडेल , तरी सर्व पण ज्यांनी आयएएस, आयपीएस, सेवक ते वर्ग चे अधिकारी घडविले अशा सर्व गुरूंना माझी छोटीशी लेखणी अर्पण करतो आणि इथेच थांबतो

आदरणीय सरांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

आपला आज्ञाधारक विद्यार्थी,

दत्ता विष्णु खुळे


Rate this content
Log in