STORYMIRROR

DATTA VISHNU KHULE

Tragedy

3  

DATTA VISHNU KHULE

Tragedy

महागाईचा भडका

महागाईचा भडका

1 min
134

महागाईचा भडका

जनसामान्यांना तडका

खिशात नाही पैसा अडका

कसे जीवन जगावे प्रश्न कडका ।।१।।


पेट्रोल ने घेतली गगन भरारी

डिझेल म्हणते मी बहू करारी

साखर तेल म्हणतं आम्ही लयच भारी

महागाईच्या चरख्यात ऊसापरी

पाचट झालीय जनता सारी ।।२।।


बेजरोजगार हिंडे दारोदारी

संतापात भांडणे घरोघरी

शिक्षण घेऊन सुद्धा नैराश्यच पदरी

महागाईने काढला लयबद्ध सूर

भरडली जात आहे त्यात जनता बेकसूर ||3||


शेतकरी कष्टकरी झालाय चकणाचुर

महागाई होईल कधी आपल्यापासून दूर

करितो पार्थना भगवंताला नष्ट होण्या महागाई

जीव झाला लाही लाही नष्ट होवो महागाईची खाई ||4||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy