STORYMIRROR

Gautami Konde

Romance Tragedy

4  

Gautami Konde

Romance Tragedy

पहिली प्रेम कविता....

पहिली प्रेम कविता....

1 min
24.3K

तू जरी अबोल असलास तरी लिहिता मला येतं

तुझ्या निरागस डोळ्यातलं बरंच काही वाचता येतं


शक्य नसतानाही तुला विसरायचा प्रयत्न चालू आहे

त्या प्रयत्नांना आता यश मिळतंय ह्याच जरा दुःख आहे


आयुष्य किती विचित्र असतं ना !


जी गोष्ट आवडत नाही ती करायला भाग पडतं

मग मन मात्र कुठल्यातरी कोपऱ्यात नुसतंच झुरत राहतं


मनातल्या भावना कागदावर लिहिल्या अन झाली तयार कविता

पण नुसतंच लिहून काय फायदा ती यमक तर जुळायला हवी ना !


आता, तुला विसरताना स्वतःलाही मी विसरतेय

आठवण म्हणून, माझी पाहिली प्रेम कविता लिहितेय...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance