पाऊस
पाऊस


श्रावणात पावसाची सर येईल धावून
रंग रंगेल धरित्री अंगी हिरवळ लेवून
नाद बासरीचा कसा मनी करी गुंजारव
रानोमाळे ऊजाळली, हंस खेळी लपंडाव
माय कशी ग ती माझी पाणी डोईया साठले
झाला मेघराज व्याकुळ वर आभाळ दाटले
कुठे मोजर पाऊस कुठे इतुकले ऊन
डुलतोय शेतकरी पानोपानी वाजे धून