STORYMIRROR

Gautami Konde

Others

3  

Gautami Konde

Others

अस्तित्व

अस्तित्व

1 min
11.8K

जात मला नसली जरी, मानव जात पाळतो मी.

किळसवाणा वाटतो जरी, कुतूहलाचा विषय मी.


हराम म्हणून मुस्लिम अन् हिजडा हिंदू धर्मातला.

शुभ शकुन असून देखील अपमान हिच दक्षिणा.


वीर्य आणि रज नसांत माझ्या, सम प्रमाणात नंदतायत.

तिरस्काराचे ते शब्द मला, स्वतःच अस्तित्व सांगतायत.


काया जरी स्त्रीची तरी मर्दानी रक्त माझं.

जन्मतः शाप घेऊन फुटलेला ते नशीब माझं.


खोटी सहानुभुती, दिलासा कधीच जवळचा वाटला नाही.

रक्ताच्या नात्यांनी देखील स्वीकार कधीच केला नाही.


खरंच अशा जगण्याला कारण काहीच नाही उरलय.

रोज रोजच मरण मात्र आता असहाय्य होत चाललंय.


Rate this content
Log in