Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Gautami Konde

Others

4.0  

Gautami Konde

Others

अस्तित्व

अस्तित्व

1 min
11.4K


जात मला नसली जरी, मानव जात पाळतो मी.

किळसवाणा वाटतो जरी, कुतूहलाचा विषय मी.


वीर्य आणि रज नसांत माझ्या, सम प्रमाणात नांदतायत.

तिरस्काराचे ते शब्द मला, स्वतःचं अस्तित्व सांगतायत.


काया जरी स्त्रीची तरी मर्दानी रक्त माझं.

जन्मतः शाप घेऊन फुटलेलं ते नशीब माझं.


खोटी सहानुभूती, दिलासा कधीच जवळचा वाटला नाही.

रक्ताच्या नात्यांनीदेखील स्वीकार कधीच केला नाही.


खरंच अशा जगण्याला कारण काहीच नाही उरलंय.

रोज रोजचं मरण मात्र आता असहाय्य होत चाललंय.


Rate this content
Log in