STORYMIRROR

Gautami Konde

Others

4  

Gautami Konde

Others

स्वप्नातील जग

स्वप्नातील जग

1 min
676

चित्रं उद्याच काढून मनात

रंग भरायला विसरलास ना 

सांग मला नेहमीप्रमाणेच 

स्वतःला आठवायला विसरलास ना |


घनदाट जंगलातील तळ्यात एका 

चुकूनच स्वतःला पाहिलंयस ना 

पाहता पाहता तिला सुद्धा 

स्वतःमध्ये जाणवलायस ना |


दिसतंय तुझ्या डोळ्यांतला सुख 

हळूच डोळे आता मिटतोयस ना 

कशाला उगाच ओठांवर हसू 

सांग तिचा च हसू शोधतोयस ना |


बहाणे आता पुरे झाले 

प्रतिबिंब विस्कळीत झाले 

चित्रंसुद्धा पुसट होतंय 

जरा आता डोळे उघडून बघ |


नव्याने सुरुवात करून पुन्हा 

स्वप्नातील जग विसरून जग ||


Rate this content
Log in