अवघडलेली ती होतीच...
अवघडलेली ती होतीच...
आई बाबाची ती परी
त्याचीही जानू ती होतीच,
आईच्या मायेत अन्
त्याच्या कुशीत ती खुश होतीच,
बाबांची शाब्बासकी अन्
त्याची साथ तिला कायम होतीच,
भावासाठी ती लाडाने काळी तर
त्याच्यासाठी स्वप्नसुंदरी ती होतीच,
शेवटी वेळ तिच्यावर वाईट होतीच,
एकीकडे घराचा जिव्हाळा
अन् त्याची लळा तिला लागली होतीच,
आई बाबांच्या डोळ्यात दुःख
अन् त्याच्याशिवाय जगणं
अशी दशा तिला करायची नव्हतीच,
इकडे आड अन् तिकडे विहीर
अश्या परिस्थितीत ती अवघडलेली होतीच...
