STORYMIRROR

Nikita Gavli

Tragedy Others

4  

Nikita Gavli

Tragedy Others

लेक परक्याचे धन

लेक परक्याचे धन

1 min
867

इवल्याश्या डोळ्यांनी पाहिलं, जग सारं नवं,

सुंदर इतकि जनु, पडे पानावर दवं.

झालो श्रीमंत अवघ्या जगी, जेव्हा कुशीत तिला घेतलं,

कशी जगाची ही रीत, लेक परक्याचे धन.



बसुन पाठीवर माझ्या घोडाघोडा खेळणारी,

होऊन स्वार घोड्यावरती, तिचा राजकुमार आला दारी.

पाहुणे, आहेर, जेवण, सगळी लगबग जनु सणं,

कशी जगाची ही रीत, लेक परक्याचे धन.


केला सांभाळ तिचा जनु, पाकळी गुलाबाची,

सजली सुंदर आज, तिच्या हातावर नक्षी.

इतका मजं आनंद कि,‍ मि तुटतोय आतुन,

कशी जगाची ही रीत, लेक परक्याचे धन.


मंडपदारी तोरण, रांगोळी अंगणी आज,

शुक्राचं चांदण अवतरल, लेवुनी श्रुंगार साज.

नव्या आयुष्यास करण्यास प्रारंभ, आज सज्ज तिचं मन,

कशी जगाची ही रीत, लेक परक्याचे धन.


चिमुकली माझी अता, मोठी ही जाहली,

बघता बघता वेळ, निघायची आली.

पाहुनी परीराणीस माझे, पाणावले नैन,

कशी जगाची ही रीत, लेक परक्याचे धन.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy