STORYMIRROR

Nikita Gavli

Others

3  

Nikita Gavli

Others

सखी

सखी

1 min
214

लक्ष्मीच्या पाऊलांनी, ओलांडुन उंबरठा,

सुवर्ण आगमण झाले तिचे.


बदलुनी ओळख, सोडून घर,

स्वत:चे नावही त्यागले तिने.


नवीन घर, नवीन जागा, माणसेही सारी नवी,

तरीही क्षणार्धात आपलस, सार्यांना केल तीने.


चालताना संसाराची वाट काटेरी,

नेहमीच व्यक्त, आनंदच केला तीने.


दिवसभर धावपळ, नी कामाची दगदग,

माझं नी मुलांच करण्या, सुख मिळे तीला.


पेलताना शिवधनुष्य कर्तव्याचे,

स्वत:लाच विसरावा लागलं तीला.


नवीन सार्या जगात आली,

थव्यात ती एकजीव झाली.


आनंद, सुख पसरवुनी सारे,

जणु सप्त रंगांचीच उधळण केली.


कसली तक्रार नाही, नाही कसला रूसवा.

नेहमीच वेळ मारून नेली तीने.


संसाराचे सोसुन चटके, शुन्य करून अपेक्षा,

शेवटच्या श्वासापर्यंत, लग्न आमचे टिकवले तीने.

           लग्न आमचे टिकवले तीने.


Rate this content
Log in