कोरोना आणि आपण
कोरोना आणि आपण
माणसाला माणसाची जात आज कळून चुकली,
माणुसकीच्या मुखवट्या मागची माणुसकी ही कळून चुकली.
देशनिष्ठ म्हणवुन घेणा लाज वाटली पाहिजे अता,
कोरोना तर दुर आपण स्वत:च स्वत:ला देतोय सजा.
वाण्याच्या पोटापाण्याची चिंता सतावू लागली त्यांना,
जे साधा साबनही ऑनलाईन मागवतात.
जिवनावश्यक वस्तुंच्या नावाखाली
स्वत:च स्वत:ला फसवु पाहतात.
अरबट चरबट खाणार्यांना,
ताजी भाजी हवी आज.
मॉर्निंग वॉकला निघाले ते,
जे नऊ पर्यंत झोपिचा चढवायचे साज.
अचानक ऑ
फिसच्या कामाची चिंता ,
जे सुट्टी नाही म्हणुन घर डोक्यावर घेतात.
घराबाहेर पडण्यास जणु,
कारणं ढिगभर शोधत बसतात.
दगडातल्या पाहण्यास देव आपण,
भक्तीच्या नजरेचा देतो सल्ला.
माणसातल्या डॉक्टररूपी देवावरच,
का आपण करतो हल्ला.
आपल्यासाठी मृत्युच्या जबड्यात रोज उतरतात,
लावुनी घरच्यांच्या जीवाला घोर.
विणाकारक घराबाहेर पडणारे
आहोत आपणच ते चोर.
जरा धिर धरा,
हि परीक्षा आहे आपली.
संयमान वागलात,
तर हे हि दिवस जातील.