संविधानाचे वास्तव
संविधानाचे वास्तव
1 min
485
समाजवादी म्हणताना,
समजाताच अंतर आहे,
लोकशाही मिरवताना,
राजेशाही सुरु आहे.
आर्थिक न्याय म्हणता,
गरीब अजूनही गरीब आहे,
राजनैतिक न्यायामुळे,
भाव श्रीमंतीचा वाढत आहे.
संधीची समानता,
चेहऱ्यावर अवलंबुन आहे.
मेहनत आणि जिद्दीचा राम,
लंकापतीशी भांडत आहे.
वसते लक्ष्मी ज्याच्या घरी,
प्रतिष्ठाही त्याचीच आहे.
बसण्यास पंगतीत प्रतिष्ठेच्या,
सामान्य व्यक्ती झगडत आहे.
संविधानाचा सुगंध,
कागदीच दरवळत आहे,
संविधान स्वतःप्रत अर्पण करून,
अंगीकृत करणे बाकी आहे.