STORYMIRROR

मीच एक पापी

मीच एक पापी

1 min
299

बोल रे तू बोल काही,

तुच्छ, घमंडी आणि काही

राग मी मानणार नाही,

कारण अधिकारच मला तो नाही


स्वार्थीही मीच आणि कपटीही मीच,

तू तर फक्त आदर्शाचं बीज

पद्धत बोलण्याची चुकते माझी,

कारण करत नाही मी तुमची हांजी हांजी


वाईट मला कशाचं वाटता कामा नये,

लहान मी सर्वात म्हणून काहीच बोलू नये

राखली पाहिजे कायम मर्जी मी तुमची,

जरी गमवावी लागेल ओळख मला माझी


अपमान झाला कितीही कसाही,

तरी मी काहीच बोलायचं नाही

म्हणे भल्यासाठी माझ्या हे सगळे,

मग भले भाव त्यात नाही


गेलं दुखावलं मन कितीही,

तरी चेहऱ्यावर दिसू द्यायचं नाही

यातना हृदयात झाल्या कितीही,

तरी शब्द तोंडातून काढायचा नाही


एकट वाटलं कितीही तरी,

व्यक्त मात्र व्हायचं नाही

राग आला कितीही जरी,

रागवायचं मात्र अजिबात नाही


म्हणे ऐकण्याची सवय पाहिजे,

कायमच आयुष्य भरी,

तुम्हीच सारे हुशार आणि,

मीच एक पापी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy