जाणवल म्हणुन....
जाणवल म्हणुन....
होता कदाचित दानव तो अमानुषतेचा,
शरीरावरच्या चिंध्या मला सांगत होत्या.
त्राण फक्त त्यांच्यातच राहिला होता,
संवेदना तर केव्हाच बेशुध्द झाल्या होत्या.
वासनेच्या सड्यात निपचित पडलेली मी,
आसवांच्या सागरावर नाराज झाले होते.
मनमुक्त किनारा न शोधता,
वेदनेला कुरवाळत राहिले.
मंद चंद्रप्रकाशाची साथ वाटल भेटेल मला कदाचित,
भोगवादी नजरेपासून मला ते वाचवतील.
पण पाठीत त्यांनीही खंजीर खुपसला,
होऊन नराधमांच्या ताफ्यात शमील.
आता ती अडगळीची खोलीचं झाली होती सखी,
सोबतीला किर्र अंधार.
माहीत नव्हत अजुन किती वेळ,
हा दानव माझ्या शरीराशी खेळणार.
असे मोर्चे किती, किती कराल आंदोलने,
रस्ता रोके, दगडफेक, अजुन किती उपोषणे.
माणुसकीच्या मुखवट्यामागचा,
वासनेचा राक्षस शोधा,
नाहीतर स्पष्ट तरी सांगुन टाका,
"मुलींनो, पर्याय नाही दुसरा, हे असच सोसत रहा."
हे असच सोसत रहा…..