STORYMIRROR

Nikita Gavli

Inspirational

4  

Nikita Gavli

Inspirational

पेटत राहुदे जिद्द

पेटत राहुदे जिद्द

1 min
379

नको माणूस हार तु,

पेटत राहुदे जिद्द. 

गेली नाही वेळ अजुनही,

तु कर स्वत:ला सिद्ध.

 

अंगारे संकटांचे हे,

आज ना उद्या विझतील.

धैर्याने पुढे चालत रहा,

तु स्वत:मधुन नवा घडशील.

 

वाटत असेल थांबला काळ,

झाले निशब्द सारे कष्ट.

अंधारातुनही दिसे किरण आशेचा,

तु कर नकारात्मकतेला नष्ट.

 

जरी पडले नियतीचे फासे आज उलटे,

तरी तु निराश होऊ नकोस.

आव्हानांशी झुंझताना मात्र,

माघार फक्त घेऊ नकोस.

 

   सावट वाईटाचं, फार काळ टिकत नसतं,

   तु फक्त मेहनतीचा गड सर कर.

   उद्याचा दिवस तुझाच असेल,

   तु फक्त निधड्या छातीने लढं.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational